Tuesday, May 22, 2018

||हे विश्वची माझे घर||

  शब्दांचे अनमोल देणे मराठी भाषेला मिळाले ते ज्ञानेश्वर माऊलींकडून.. ज्या ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी पसायदान लिहिलं, विश्वासाठी विठ्ठला कडे साकडे घातले आणि अजरामर ओळी लिहिल्या..
                 "दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
                     जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥" ज्ञानेश्वरांनीच ||हे विश्वची माझे घर|| हा मंत्र या विश्वाला अर्पण केला आणि हे सगळ वाचल कि मनाच्या तारा प्रकाशमान होतायेत अस वाटत. ज्या पुण्या भूमीत माऊली जन्माला आली त्याच पुण्य भूमीत (महाराष्ट्रात) - संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो किती मोठ हे भाग्य!
  
  माऊली हि स्पंदने जो पर्यंत तुझ्यात असतात, तुझ्या अवती भोवतीच्या विचारात असतात तोपर्यंत अगदी जगाशी नाळ जुळलेली असते आणि वाटत नाही खरच हे विश्वाची माझे घरं.. पुन्हा मात्र मनाच्या गाभार्यातून बाहेर येऊन ह्या - त्याच त्या पुण्यश्लोक मातीला पाहायला लागतो कि भाम्बाहून जातो मी.. अहंकार, स्वार्थ, मत्सर, घृणा, असहिष्णुता, असभ्यता, लोभ, मोह आणि किती काय माऊली "कलयुग" म्हणजे खरच आता दिसायला लागलय. माऊली विश्वाला घर समजण्यामध्ये जे सामर्थ्य लागते, जी कल्पना शक्ती लागते, जी शक्ती लागते ती तुझ्यातच होती म्हणून तू "विश्वाची माऊली" झालीस आणि आता इथल्या माणसाला मात्र स्वतःचा संसारही मनासारखा थाटण्याच धैर्य, टाकत, कुवत राहिली नाहीये.

 माऊली प्रेम, माया, ममता यांच्याही परे आणि अखंड शक्ती असणारे तुझे नाव म्हणजेच विठ्ठलाचे नाव! तू आणि तो वेगेळे आहात तरी कुठे? तू म्हणजेच हरी, हरी म्हणजेच श्रीकृष्ण, श्रीकृष्णच व्यंकटेश, व्यंकटेश म्हणजेच विठ्ठल.. आणि जिथे विठ्ठल तिथे तुझ्याविना कसे चालेल? पण माऊली आता हा विठ्ठलही फक्त वारीला आठवतो. वारी संपली कि तो हि शांतच असतो. त्याच्याकडेही माघायालाच जातात कारण तो घेत काहीच नाही. हा माणूस मात्र माघतच असतो, माघतच असतो आणि फक्त माघातच मरतो.

 आज खर तर मला काहीतरी माघायाच होत माझ्या विठ्ठलाकडे.. एकदा तुझ्या ओळी वाचल्या माऊली आणि वाटल,
                         "तुला काय माघू आता| सारे दिले या पामरास||
                          देह राहो गुंतुनी सदा हा| तुझ्या गोड नामात||

Thursday, May 8, 2014

आकाशवाणी..!


मित्रहो, नमस्कार.

खूप दिवसांनी मी ब्लॉग लिहितोय. मधे असं काही घडल कि तुम्हा सर्वांसोबत बोलायला वेळच मिळाला नाही. मी हैद्राबाद सोडलं, पुण्यात आलो.
खूप जणांसोबत बोललो नाही. खूप लोकांना जवळच्या मित्रांना सांगितलं नाही पण शेवटी मी दूर गेलो असं काही नाही.

मजेदार गोष्ट म्हणजे मी कुठे जरी गेलो तरी माझ्यातलं मराठी मन कसे सोडलं. मी दुसर्या राज्यात जाऊन आदरणी लोकांना "जय महाराष्ट्र" म्हणायला लावलं तसच मी त्याच्याही संस्कृतीशी एकरूप झालो. मला खूप काही शिकायला मिळाल, मी खूप "माणसांना" भेटलो आणि माझा प्रवास सुरु ठेवला. पण कला क्षेत्रात काही आपलाही योगदान असाव ती जिद्द मात्र माझ्या मनात कायम जिवंत आहे.

माणसाबद्दल आपण बराच बोललो पण त्याहून वेगळी मानस आपल्या अवती भोवती असतात हे मात्र "आय. टी." क्षेत्रात येउन विसरल्यागत झाल होत.
११ एप्रिल २०१४ रोजी मी एक मुलाखत घेतली आणि ती हि "पुणे आकाशवाणी" वर.. विषय होता "रविवारचा आदिवासिसाठीचा दवाखाना".. आणि भेट झाली एका जगावेगळ्या व्यक्तीसोबत "उपेंद्र देशमुख (काका)". निःस्वार्थ आदिवासी लोकांसाठी काम करणारा माणूस. मुलांची शिक्षण व्हावीत, तरुण मुलांची प्रगती व्हावी या साठी लढणारा हा महामानव.

रायगड जिल्हा, "आतोने" या गावी ते "कामाला भानू" प्रतिष्ठान अंतर्गत काम चालवतात. कोणाकडून कशाचीही अपेक्षा न करता. पुण्यात आलो आणि पहिल्यांदी काकाची मुलाखत घेऊन आकशवाणी वर येण्याची संधी मिळाली. आकाशवाणी वर आपणही एखादा कार्यक्रम करावा, आपला आवाज आपण ऐकावा हि बालपणाची इच्छा शेवटी ४ मे २०१४ रोजी पूर्ण झाली.

आता मात्र अशा जगावेगळ्या माणसांच्या शोधत भटकाव, मानस शिकवीत, मानस भेटावीत आणि अशा बाळगतो कि जगावेगळ्या माणसांची शृंखला अशीच वाढत जावी.. बराच लिहायचं माझ्या बद्दल, पुणे शहराबद्दल.. नव्या माणसांबद्दल... तुमच्या साठी तुमच्या सोबत..!

धन्यवाद...!

Monday, January 6, 2014

वर्षाअखेर...!


वर्षाअखेर...

कधी मला पण समजून घ्या रे..
कधी मला पण कवेत घ्या रे..
हे तार्र्यानो हे दिशांनो...
कधी मला पण उडू द्या रे...!

वर्षा अखेर पुह एकदा तेच लिहाव, तेच जगावं का काही तरी नव्याने उपजत आपण आपलाच जपून ठेवलेलं, लेख्या जोख्यात साठवून ठेवलेलं तेच काढून तसच गिरवाव. असा वाटल तरी वर्ष बदलतात, दिवसं सरतात.
आणि प्रारब्ध हि आपलंच असत आपल्याच हातात.

मी म्हणालो तसं,
" ती कविताही सोडून गेली, केवळ नव्याने जन्माला येण्यासाठी"
असंच सगळ सुटत गेल, वाटत नव्यानेच जन्माला येण्यासाठी.. कारण तेच, कोण आहे इथे ओळखीच? सगळेच अनोळखी फक्त हृदय तेवढ तसच चालणारं.. आपल्याच सोबत आणि ती स्पंदने..! तो आनंदही तूच तुझा शोधायचा, तो उत्सवही तू तुझाच करायचा, आणि जगायच तसच एकदम जोशात...

"कारण आयुष्य म्हणजे उत्सव आणि उत्सव म्हणजेच आयुष्य..."
मला वाटते एवढच पुरे.. वर्षा अखेर.. आणि नव्या सुरुवातीला...!  
 

Monday, December 30, 2013

कधी कधी..!

कधी-कधी या शब्दांनी मला बांधलय. कवितेत, लिखाणात बरेचदा हे कधी-कधी आल्याशिवाय राहत नाही. कधी-कधी या साठी कि हि स्पंदनांची भाषा पण बदलत असते. कधी ती लयात असते, कधी ती तालात असते.

वेळेनुसार बदलणारे असे हे कधी-कधी... शेवटी खेळ स्पंदनांचा.. भावनेचा, विषयांचा, विचारांचा आणि आयुष्याच्या मार्गावरून बदलत जाणारा हा कधी-कधी हसवणारा, रडवणारा, धुंदी घालणारा प्रवास..! कधी स्वतःसाठी लिहायचं, कधी तिच्यासाठी लिहायचं, कधी जगासाठी लिहायचं आणि परत स्पदानांमध्ये त्याला अडकवून कधी कधी आठवायचं. खेळच सारा.

मन जागेवर असत, तन जागेवर असत पण त्याला लागणार वेड कशाच, कधी आणि का म्हणून याची उत्तरं फक्त आणि फक्त नियतीच देऊ शकेल. एखादी गोष्ट ती तेंव्हाच आणि तशीच व्हावी, घडावी, कधी-कधीच ती दिसावी, भेटावी आणि परत कधी-कधी आणि अजून लिहाव म्हंटल तर खूप आहे साचलेलं, कधी-कधी सोबत बांधलेलं.

साऱ्याची उत्तरं पण कधी-कधी.. काही सापडलं तुम्हालाही तर नक्की कळवा.. कधीतरी..!  
 

Friday, December 6, 2013

स्पंदने: आशाये..!

  माणूस म्हणून जन्माला आल म्हणजे नेमक काय हे मात्र थोड कळायला अवघड, नेमक हे आहे काय? कशासाठी? जगने-मरणे बरच काही.. सगळ शेवटी स्पदनांशी बांधलेलं. हे आयुष्य त्याच भविष्य, हसवा रुसवा, काल-आज-उद्या सार तर त्या ठोक्यान इतकच! पण आज "आशये" लिहितोय. आशा च असते न मानसा जवळ नेहमी त्याला अगदी तसच ताजेतवान करून जीवन जगायला लावणारी...!

 स्वामी विवेकानंद म्हणतात जेंव्हा माणूस सगळ काही हरवतो तेंव्हा त्याच्याकडे उरते ती फक्त उम्मीद - आशा ते सार परत मिळवण्यासाठी.. तीच आशा घेऊन हा प्रवास सुरु असतो. कोणीतरी लिहिलंय,
                                       "घरमे आग लगी थी, जलकर सबकुछ राख हो गया था|
                                         अगर जिंदा मै हु, तो जला क्या था||"

जोपर्यंत आहे श्वास ह्या धमन्यात तो पर्यंत जळालय तरी काय? आणि मात्र जेंव्हा हा श्वासच संपेल तेंव्हाच उधवस्त होईल हे सार..! सगळ्यात मोठी विषारीच म्हणेन अशी गोष्ट म्हणजे "अपेक्षा" करत राहणे. मी म्हणेन तीच तर संपवते कार्यभाग. अपेक्षा करायची हे व्हाव ते व्हाव पण कुणाच्या भरवश्यावर? आणि तुला ते पाहिजेच तर मग कसला त्रास? लढ फक्त तुझ्या पवित्र विचारांनी आणि शेवटी आहेच न सोबत तुला तुझीच तुझ्या आशेची..!

 वाटायचं मलाही स्वप्नांसारखं असाव हे आयुष्य.. आजही स्वप्न आहेत या डोळ्यात आणि असतीलही पण ती पूर्ण करण्यासाठी जोवर तुमच्या खांद्यावर त्यांना जबाबदारी म्हणून तुम्ही पेलणार नाहीत तोवर तुम्ही लढनार नाहीत आणि त्या क्षणा पर्यंत ती स्वप्न मात्र पापणीच्या अस्तराखाली तशीच दडून बसलेली असतील नव्हे नव्हे त्यांनी त्यांचा श्वासही सोडण्याची तयारी केली असेल! पुन्हा एकदा वर्तमान आणि वास्तविकता पहिली कि मन थोडस कावर-बावर होते आणि वाटत नको हे असल स्वप्नांसाठी लढण..

 पण मग लढायचं नाही तर रडायचं कशाला? पुन्हा त्याच मनाला समजवायला लागतो, पुन्हा त्याच स्पंदनांशी बोलायला लागतो आणि बेंबीच्या देठापासून चा आवाज मग मलाच बोलून जातो, मनात गर्जून जातो, "आशाये"...! कारण त्याच फुलवतात स्वप्न आयुष्याच्या बगीच्यात...!


Wednesday, November 27, 2013

स्पंदने -१

  स्पंदने म्हणून लिहायचं असा विचार आला आणि वाटलं खरच या स्पंदना शिवाय जन्मल्या पासून सोबत असत तरी काय..? स्पंदने म्हणजेच आयुष्य, तेच असत सतत सुरु आपल्यासाठी, आपल्यासोबत आणि श्वास संपेपर्यंत. पण स्पंदने म्हणजे हृदयाबद्दल फक्त लिहायचं नाहीये. मला स्पंदने म्हणजे प्रत्येक दिवस, त्याला जोडलेली क्षण आणि त्यांनी दिलेली देणगी, विचार, बराच काही..

 माणसाला येणारी ६०-७० हजार विचार तीही एकाच दिवसात, त्यांच्या सोबत बदलणारी हृदयाची ठोके - स्पंदने..! आनंद झाला, हसू आलं, रडायला आलं, दु:ख झालं मग ते काही पण असू देत स्पंदन त्याच्या सोबत बोलत असतात. ती तुमच्या विचारांसोबत, तुमच्या मनासोबत त्यांचा प्रतिसाद देत असतात आणि जगत असतात तुम्ही जे जगता तेच!

 लिहिताना सुद्धा यांना एक लय आलेली असते, त्यांची भाषा बदलते. त्यांची हालचाल जशी बदलते तसाच बदलत असत हे आयुष्य आणि त्याच्या सोबत बांधलेलं आपलं भविष्य. आता ते प्रत्येक पावलावर काय बोलत, ते काय सांगत, एकत, आणि मला कस चालवत नेत या उधाणलेल्या सागरात माझ्या आयुष्याची नौका घेऊन तेच तर असेल माझ्या आपल्या सगळ्यांचा एक वेगळा स्पंदनांचा प्रवास...!

  माणूस व्यक्त होत असतो. त्यांनी व्यक्त होण गरजेच असत सुद्धा कारण व्यक्त झाल्याशिवाय त्यांच्या स्पंदनांचा वेध घेण अवघड असत. त्यामुळे मी व्यक्त होणारच आहे. आपल्यालाही आपल्या प्रतिक्रिया द्यावयाच्या आहेत आणि स्पंदने काय बोलतात ते सांगायचे आहे.

Monday, November 25, 2013

सुरुवात..!

   प्रत्येक गोष्ट नवीन असतेच तीच नाविन्य असत. आपण म्हणतो न एखादी गोष्ट सदैव तीच अस्तित्व टिकवून असते आणि तीच काळासोबत पुढे जात राहते. अस म्हणतात ज्यात खरच दिव्यत्व असत, भव्यता असते, तेज असते आणि सत्यता असते ती गोष्ट मात्र "ज्ञानेश्वरी" सारखी हजारो वर्षे सुवर्ण मंदिराच्या खांबा सारखी आपल अस्तित्व टिकवून असते.

  मीही तोच विचार धरून चालतो, आणि तसाच विचार करत राहीलही. आपण जे जगतो ते लिहून काढणे म्हणजेच सत्याशी रोज भेटत राहणे आणि तेच जगताना मिळत गेलेलं आपल्या लेख्या जोख्यात वाढवत जाने हीच खरी लेखकाची संपत्ती! तुमच्या चांगल्या कामासाठी ईश्वरही सदैव उभा असतो, तो सत्याला धरूनच मदत करतो.

  माझ्या लिखाणाच अस्तित्व मला टिकवायचंय, त्याला प्रगल्भ करायचंय. हि सुरुवात आपल्या साक्षीने आणि सदिछ्या सोबत घेऊन करत आहे. प्रवास एकट्याचा कधीच नसतो आणि तुम्ही आहातच माझ्या सोबत ह्या एका नव्या प्रवासात..!