Wednesday, November 27, 2013

स्पंदने -१

  स्पंदने म्हणून लिहायचं असा विचार आला आणि वाटलं खरच या स्पंदना शिवाय जन्मल्या पासून सोबत असत तरी काय..? स्पंदने म्हणजेच आयुष्य, तेच असत सतत सुरु आपल्यासाठी, आपल्यासोबत आणि श्वास संपेपर्यंत. पण स्पंदने म्हणजे हृदयाबद्दल फक्त लिहायचं नाहीये. मला स्पंदने म्हणजे प्रत्येक दिवस, त्याला जोडलेली क्षण आणि त्यांनी दिलेली देणगी, विचार, बराच काही..

 माणसाला येणारी ६०-७० हजार विचार तीही एकाच दिवसात, त्यांच्या सोबत बदलणारी हृदयाची ठोके - स्पंदने..! आनंद झाला, हसू आलं, रडायला आलं, दु:ख झालं मग ते काही पण असू देत स्पंदन त्याच्या सोबत बोलत असतात. ती तुमच्या विचारांसोबत, तुमच्या मनासोबत त्यांचा प्रतिसाद देत असतात आणि जगत असतात तुम्ही जे जगता तेच!

 लिहिताना सुद्धा यांना एक लय आलेली असते, त्यांची भाषा बदलते. त्यांची हालचाल जशी बदलते तसाच बदलत असत हे आयुष्य आणि त्याच्या सोबत बांधलेलं आपलं भविष्य. आता ते प्रत्येक पावलावर काय बोलत, ते काय सांगत, एकत, आणि मला कस चालवत नेत या उधाणलेल्या सागरात माझ्या आयुष्याची नौका घेऊन तेच तर असेल माझ्या आपल्या सगळ्यांचा एक वेगळा स्पंदनांचा प्रवास...!

  माणूस व्यक्त होत असतो. त्यांनी व्यक्त होण गरजेच असत सुद्धा कारण व्यक्त झाल्याशिवाय त्यांच्या स्पंदनांचा वेध घेण अवघड असत. त्यामुळे मी व्यक्त होणारच आहे. आपल्यालाही आपल्या प्रतिक्रिया द्यावयाच्या आहेत आणि स्पंदने काय बोलतात ते सांगायचे आहे.

Monday, November 25, 2013

सुरुवात..!

   प्रत्येक गोष्ट नवीन असतेच तीच नाविन्य असत. आपण म्हणतो न एखादी गोष्ट सदैव तीच अस्तित्व टिकवून असते आणि तीच काळासोबत पुढे जात राहते. अस म्हणतात ज्यात खरच दिव्यत्व असत, भव्यता असते, तेज असते आणि सत्यता असते ती गोष्ट मात्र "ज्ञानेश्वरी" सारखी हजारो वर्षे सुवर्ण मंदिराच्या खांबा सारखी आपल अस्तित्व टिकवून असते.

  मीही तोच विचार धरून चालतो, आणि तसाच विचार करत राहीलही. आपण जे जगतो ते लिहून काढणे म्हणजेच सत्याशी रोज भेटत राहणे आणि तेच जगताना मिळत गेलेलं आपल्या लेख्या जोख्यात वाढवत जाने हीच खरी लेखकाची संपत्ती! तुमच्या चांगल्या कामासाठी ईश्वरही सदैव उभा असतो, तो सत्याला धरूनच मदत करतो.

  माझ्या लिखाणाच अस्तित्व मला टिकवायचंय, त्याला प्रगल्भ करायचंय. हि सुरुवात आपल्या साक्षीने आणि सदिछ्या सोबत घेऊन करत आहे. प्रवास एकट्याचा कधीच नसतो आणि तुम्ही आहातच माझ्या सोबत ह्या एका नव्या प्रवासात..!

Sunday, November 24, 2013

नमस्कार..!

खूप दिवसांपासून आपलाही ब्लॉग असावा आणि मी लिहित राहावं अशी माझ्या सोबतच अनेकांची इच्छा होती. छान वाटतंय व्यासपीठ मिळाल्यासारखे.. किती दिवसांपासून व्यासपीठ दूर झाल्यागत झाल होत पण आता इकडे लिहिणार आहे आपल्या सगळ्यांसाठी..!

आता हा स्पंदनांचा प्रवास सुरु झालाय. स्पंदने, मानसं आणि अजून भरपूर विषय घेऊन येतोय..! आपण तशीच दाद देणार आणि प्रेम करणार याचा विश्वास आहेच.. चला तर मग लवकरच भेटू...!

- सुमित कहात.