Wednesday, November 27, 2013

स्पंदने -१

  स्पंदने म्हणून लिहायचं असा विचार आला आणि वाटलं खरच या स्पंदना शिवाय जन्मल्या पासून सोबत असत तरी काय..? स्पंदने म्हणजेच आयुष्य, तेच असत सतत सुरु आपल्यासाठी, आपल्यासोबत आणि श्वास संपेपर्यंत. पण स्पंदने म्हणजे हृदयाबद्दल फक्त लिहायचं नाहीये. मला स्पंदने म्हणजे प्रत्येक दिवस, त्याला जोडलेली क्षण आणि त्यांनी दिलेली देणगी, विचार, बराच काही..

 माणसाला येणारी ६०-७० हजार विचार तीही एकाच दिवसात, त्यांच्या सोबत बदलणारी हृदयाची ठोके - स्पंदने..! आनंद झाला, हसू आलं, रडायला आलं, दु:ख झालं मग ते काही पण असू देत स्पंदन त्याच्या सोबत बोलत असतात. ती तुमच्या विचारांसोबत, तुमच्या मनासोबत त्यांचा प्रतिसाद देत असतात आणि जगत असतात तुम्ही जे जगता तेच!

 लिहिताना सुद्धा यांना एक लय आलेली असते, त्यांची भाषा बदलते. त्यांची हालचाल जशी बदलते तसाच बदलत असत हे आयुष्य आणि त्याच्या सोबत बांधलेलं आपलं भविष्य. आता ते प्रत्येक पावलावर काय बोलत, ते काय सांगत, एकत, आणि मला कस चालवत नेत या उधाणलेल्या सागरात माझ्या आयुष्याची नौका घेऊन तेच तर असेल माझ्या आपल्या सगळ्यांचा एक वेगळा स्पंदनांचा प्रवास...!

  माणूस व्यक्त होत असतो. त्यांनी व्यक्त होण गरजेच असत सुद्धा कारण व्यक्त झाल्याशिवाय त्यांच्या स्पंदनांचा वेध घेण अवघड असत. त्यामुळे मी व्यक्त होणारच आहे. आपल्यालाही आपल्या प्रतिक्रिया द्यावयाच्या आहेत आणि स्पंदने काय बोलतात ते सांगायचे आहे.

No comments:

Post a Comment