Monday, December 30, 2013

कधी कधी..!

कधी-कधी या शब्दांनी मला बांधलय. कवितेत, लिखाणात बरेचदा हे कधी-कधी आल्याशिवाय राहत नाही. कधी-कधी या साठी कि हि स्पंदनांची भाषा पण बदलत असते. कधी ती लयात असते, कधी ती तालात असते.

वेळेनुसार बदलणारे असे हे कधी-कधी... शेवटी खेळ स्पंदनांचा.. भावनेचा, विषयांचा, विचारांचा आणि आयुष्याच्या मार्गावरून बदलत जाणारा हा कधी-कधी हसवणारा, रडवणारा, धुंदी घालणारा प्रवास..! कधी स्वतःसाठी लिहायचं, कधी तिच्यासाठी लिहायचं, कधी जगासाठी लिहायचं आणि परत स्पदानांमध्ये त्याला अडकवून कधी कधी आठवायचं. खेळच सारा.

मन जागेवर असत, तन जागेवर असत पण त्याला लागणार वेड कशाच, कधी आणि का म्हणून याची उत्तरं फक्त आणि फक्त नियतीच देऊ शकेल. एखादी गोष्ट ती तेंव्हाच आणि तशीच व्हावी, घडावी, कधी-कधीच ती दिसावी, भेटावी आणि परत कधी-कधी आणि अजून लिहाव म्हंटल तर खूप आहे साचलेलं, कधी-कधी सोबत बांधलेलं.

साऱ्याची उत्तरं पण कधी-कधी.. काही सापडलं तुम्हालाही तर नक्की कळवा.. कधीतरी..!  
 

No comments:

Post a Comment