Friday, December 6, 2013

स्पंदने: आशाये..!

  माणूस म्हणून जन्माला आल म्हणजे नेमक काय हे मात्र थोड कळायला अवघड, नेमक हे आहे काय? कशासाठी? जगने-मरणे बरच काही.. सगळ शेवटी स्पदनांशी बांधलेलं. हे आयुष्य त्याच भविष्य, हसवा रुसवा, काल-आज-उद्या सार तर त्या ठोक्यान इतकच! पण आज "आशये" लिहितोय. आशा च असते न मानसा जवळ नेहमी त्याला अगदी तसच ताजेतवान करून जीवन जगायला लावणारी...!

 स्वामी विवेकानंद म्हणतात जेंव्हा माणूस सगळ काही हरवतो तेंव्हा त्याच्याकडे उरते ती फक्त उम्मीद - आशा ते सार परत मिळवण्यासाठी.. तीच आशा घेऊन हा प्रवास सुरु असतो. कोणीतरी लिहिलंय,
                                       "घरमे आग लगी थी, जलकर सबकुछ राख हो गया था|
                                         अगर जिंदा मै हु, तो जला क्या था||"

जोपर्यंत आहे श्वास ह्या धमन्यात तो पर्यंत जळालय तरी काय? आणि मात्र जेंव्हा हा श्वासच संपेल तेंव्हाच उधवस्त होईल हे सार..! सगळ्यात मोठी विषारीच म्हणेन अशी गोष्ट म्हणजे "अपेक्षा" करत राहणे. मी म्हणेन तीच तर संपवते कार्यभाग. अपेक्षा करायची हे व्हाव ते व्हाव पण कुणाच्या भरवश्यावर? आणि तुला ते पाहिजेच तर मग कसला त्रास? लढ फक्त तुझ्या पवित्र विचारांनी आणि शेवटी आहेच न सोबत तुला तुझीच तुझ्या आशेची..!

 वाटायचं मलाही स्वप्नांसारखं असाव हे आयुष्य.. आजही स्वप्न आहेत या डोळ्यात आणि असतीलही पण ती पूर्ण करण्यासाठी जोवर तुमच्या खांद्यावर त्यांना जबाबदारी म्हणून तुम्ही पेलणार नाहीत तोवर तुम्ही लढनार नाहीत आणि त्या क्षणा पर्यंत ती स्वप्न मात्र पापणीच्या अस्तराखाली तशीच दडून बसलेली असतील नव्हे नव्हे त्यांनी त्यांचा श्वासही सोडण्याची तयारी केली असेल! पुन्हा एकदा वर्तमान आणि वास्तविकता पहिली कि मन थोडस कावर-बावर होते आणि वाटत नको हे असल स्वप्नांसाठी लढण..

 पण मग लढायचं नाही तर रडायचं कशाला? पुन्हा त्याच मनाला समजवायला लागतो, पुन्हा त्याच स्पंदनांशी बोलायला लागतो आणि बेंबीच्या देठापासून चा आवाज मग मलाच बोलून जातो, मनात गर्जून जातो, "आशाये"...! कारण त्याच फुलवतात स्वप्न आयुष्याच्या बगीच्यात...!


No comments:

Post a Comment