Tuesday, May 22, 2018

||हे विश्वची माझे घर||

  शब्दांचे अनमोल देणे मराठी भाषेला मिळाले ते ज्ञानेश्वर माऊलींकडून.. ज्या ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी पसायदान लिहिलं, विश्वासाठी विठ्ठला कडे साकडे घातले आणि अजरामर ओळी लिहिल्या..
                 "दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
                     जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥" ज्ञानेश्वरांनीच ||हे विश्वची माझे घर|| हा मंत्र या विश्वाला अर्पण केला आणि हे सगळ वाचल कि मनाच्या तारा प्रकाशमान होतायेत अस वाटत. ज्या पुण्या भूमीत माऊली जन्माला आली त्याच पुण्य भूमीत (महाराष्ट्रात) - संतांच्या भूमीत आपण जन्माला आलो किती मोठ हे भाग्य!
  
  माऊली हि स्पंदने जो पर्यंत तुझ्यात असतात, तुझ्या अवती भोवतीच्या विचारात असतात तोपर्यंत अगदी जगाशी नाळ जुळलेली असते आणि वाटत नाही खरच हे विश्वाची माझे घरं.. पुन्हा मात्र मनाच्या गाभार्यातून बाहेर येऊन ह्या - त्याच त्या पुण्यश्लोक मातीला पाहायला लागतो कि भाम्बाहून जातो मी.. अहंकार, स्वार्थ, मत्सर, घृणा, असहिष्णुता, असभ्यता, लोभ, मोह आणि किती काय माऊली "कलयुग" म्हणजे खरच आता दिसायला लागलय. माऊली विश्वाला घर समजण्यामध्ये जे सामर्थ्य लागते, जी कल्पना शक्ती लागते, जी शक्ती लागते ती तुझ्यातच होती म्हणून तू "विश्वाची माऊली" झालीस आणि आता इथल्या माणसाला मात्र स्वतःचा संसारही मनासारखा थाटण्याच धैर्य, टाकत, कुवत राहिली नाहीये.

 माऊली प्रेम, माया, ममता यांच्याही परे आणि अखंड शक्ती असणारे तुझे नाव म्हणजेच विठ्ठलाचे नाव! तू आणि तो वेगेळे आहात तरी कुठे? तू म्हणजेच हरी, हरी म्हणजेच श्रीकृष्ण, श्रीकृष्णच व्यंकटेश, व्यंकटेश म्हणजेच विठ्ठल.. आणि जिथे विठ्ठल तिथे तुझ्याविना कसे चालेल? पण माऊली आता हा विठ्ठलही फक्त वारीला आठवतो. वारी संपली कि तो हि शांतच असतो. त्याच्याकडेही माघायालाच जातात कारण तो घेत काहीच नाही. हा माणूस मात्र माघतच असतो, माघतच असतो आणि फक्त माघातच मरतो.

 आज खर तर मला काहीतरी माघायाच होत माझ्या विठ्ठलाकडे.. एकदा तुझ्या ओळी वाचल्या माऊली आणि वाटल,
                         "तुला काय माघू आता| सारे दिले या पामरास||
                          देह राहो गुंतुनी सदा हा| तुझ्या गोड नामात||